Next

... म्हणून आशिष शेलारांना धमक्या येत होत्या Death threat calls to BJP MLA Ashish Shelar

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:43 IST2022-01-10T15:43:17+5:302022-01-10T15:43:41+5:30

राज्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरेसह काही शिवसेना नेत्यांना धमकीचे फोन आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आशिष शेलारांनी आपल्याला अनोखळी फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोनवरुन Ashish Shelar यांना धमकी देण्यात आली होती. आशिष शेलारांना धमकावणारी व्यक्ती कोण व धमक्या का येतायत अशी चर्चा तेव्हा सुरु झाली होती.