Next

भाजपमधून बाहेर पडलेला हा आमदार धमाका करण्याच्या तयारीत | 18 corporators to join NCP?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:18 PM2022-01-12T16:18:10+5:302022-01-12T16:18:30+5:30

18 councilors from Lonavla will join NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील शेळके यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांचा पराभव केला. तब्बल पंचवीस वर्ष भाजपची सत्ता राहिलेला मावळ मतदारसंघ त्यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला.. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यामुळे सुनील शेळके राज्यभरात चर्चेत आले होते. आता सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्याचं ठरवलं असं दिसतंय. पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगर परिषदेतील तब्बल 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटेवर असल्याची माहिती समोर येतीय.. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून...