Next

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये बनणार ई पासपोर्ट | All You Need To Know About E-Passport Seva

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:18 PM2022-02-04T16:18:32+5:302022-02-04T16:18:54+5:30

पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेस मध्ये अत्याधुनिक चिप च्या साहाय्याने ही पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलाय. त्यास केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असल्याने नाशिककरांसाठी हा बहुमान असल्याचं बोललं जाऊ लागलंय. सुरक्षितेच्या दृष्टीने ई पासपोर्ट महत्त्वाचा असणार आहे. त्यामध्ये आधुनिक सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली असेल. डिजिटल स्वाक्षरीसह पासपोर्ट मधील माहिती लिक होऊ शकणार नाही, अशी चिप यामध्ये बसवली जाणार आहे. संपूर्ण माहिती सुरक्षित राहील अशी व्यवस्था या पासपोर्ट मध्ये असेल. या पासपोर्ट मध्ये कोणी काही छेडखानी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची माहिती सिस्टम मला लागलीच कळणार आहे. भारतातील इ पासपोर्ट प्रणाली सुरू करण्याबाबतचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आल्यानंतर अशा प्रकारच्या पासपोर्टची छपाई नाशिक मध्ये व्हावी यासाठी नाशिकमधून मोठे प्रयत्न केले गेले होते. त्यानुसार केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये इ पासपोर्ट तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राचे या निर्णयामुळे प्रेसमधील कामगाराने देखील समाधान व्यक्त केले आहे...