Next

या शिवसेना नेत्याने तुरुंगात गेलेल्या नितेश राणेंना डिवचलं Nitesh Rane Arrest -Narayan Rane ShivSena

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:17 PM2022-02-04T16:17:24+5:302022-02-04T16:17:46+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली.. पण या निवडणुकीसोबत राणेंच्या मागे संतोष परब हल्ला प्रकरण असं चिकटलं.. की याच प्रकरणाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना तुरुंगात टाकलं... सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हाही नितेश राणे हे गायब होते... निकालाच्या दिवशी जेव्हा जिल्हा बँकेवर राणेंची सत्ता आली, तेव्हा नितेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं.. ज्यावर फक्त गाडलाच असं लिहिलं होतं.. या पोस्टरमध्ये नितेश राणे हे शिवसेना नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष, सतीश सावंत यांच्यावर पाय देऊन नितेश राणे उभे आहेत, असं दाखवण्यात आलंय.. आता याच सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर बोचरी टीका केलेय... राणेंनी जिल्हा बँकेज ज्यांना धूळ चारली, त्या सतीश सावंतांनी राणेंच्या अटकेनंतर आता काय म्हटलं पाहुयात.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...