शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:38 AM2024-06-18T10:38:09+5:302024-06-18T10:39:10+5:30

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने दोन हजार रुपये पाठवणार आहे. 

PM Kisan Yojana : Good news for farmers, 2000 rupees will be deposited in the bank account today! | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज म्हणजेच १८ जून रोजी पहिल्यांदाच वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी ते देशभरातील जवळपास १० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने दोन हजार रुपये पाठवणार आहे. 

खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आज पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. वाराणसीत शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी ही भेट देणार आहेत. याशिवाय, स्वयं-सहायता गटांच्या (SHGs) ३०,००० हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील नरेंद्र मोदी प्रदान करतील. त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे, जेणेकरून ते पॅरा-विस्तार कामगार म्हणून काम करू शकतील आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करू शकतील. 

दरम्यान, पीएम किसान योजनेसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) उपक्रम आहे, जो २०१९ मध्ये सुरू झाला होता. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारने ३.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम १६ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरित केली आहे. तसेच, या योजनेचा देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत.

योजनेचे तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये हे पैसे मिळतात. दरवर्षी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हस्तांतरित केला जातो. मात्र, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. काही वेळा लाभार्थ्यांचे पैसेही अडकतात. अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तसेच, काही हेल्पलाइन क्रमांक देखील आहेत (हेल्पलाइन क्रमांक- १५५२६१ किंवा १८००११५५२६) ज्यावर शेतकरी त्यांच्या समस्या सोडवू शकतात.

Web Title: PM Kisan Yojana : Good news for farmers, 2000 rupees will be deposited in the bank account today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.