Next

'... जास्त त्रास होतो, काळजी घे', पंकजा आणि धनंजय मुंडेंचा संवाद Dhananjay Munde Vs Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:21 PM2022-01-04T16:21:51+5:302022-01-04T16:22:15+5:30

बहीण-भावाचं नातं हे इतर नात्यांपेक्षा फार वेगळं मानलं जातं... लहानपणी एकमेकांना चिडवणं, भांडणं, मस्ती करणं, मोठं झाल्यावर घरातील काही गोष्टीवरुन वाद घालणं, हक्कासाठी भांडणं हे बहिण-भावाच्या नात्यात नेहमीच सुरु असतं.. पण लहानपणापासून ते म्हातारं होईपर्यंत या नात्यातलं प्रेम मात्र कमी होत नाही.. जिव्हाळा, काळजी ही नेहमीच असते.. म्हणूनच लोकही म्हणतात की बहिण-भाऊच ते... असेच बहिण-भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत.. ते नेहमी भांडतात, टीका करतात पण सुखदुखात मात्र ते एकमेकांसोबत असतात.. ते बहिण-भाऊ म्हणजे Pankaja Munde आणि Dhananjay munde.