Next

चेक बाऊन्स केला म्हणून 'या' सेना खासदाराला १ वर्षाचा तुरुंगवास...पाहा काय घडलंय? Rajendra Gavit

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:43 PM2022-02-15T23:43:20+5:302022-02-15T23:44:47+5:30

भाजपचे साडे तीन नेते, ईडी, जेलची हवा यावरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्या भिडतायत. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेचे अनिल परब, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर, रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली. अगदी संजय राऊत यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता याच सगळ्या गोंधळात शिवसेनेच्या एका मोठ्या खासदाराला कोर्टानं दणका दिलाय, तब्बल एका वर्षाची शिक्षा आणि कोट्यवधींचा दंड ठोठावलाय. फसवणूक केली, चेक बाऊन्स केला म्हणून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना पालघर कोर्टानं शिक्षा सुनावलीय. गावित यांनी कुणाकडून पैसे घेतले होते, कुणाची फसवणूक केली, आता गावितांचं काय होणार, शिवसेना एक पक्ष म्हणून गावितांवर कारवाई करणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात की नेमकं प्रकरण काय आहे ते...