Honeymoon in Flight: फ्लाईटमध्येच 'हनीमून'ची सोय होणार! Love in the Air | Love Cloud Vegas | Travel
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:17 IST2021-11-17T15:16:44+5:302021-11-17T15:17:18+5:30
Honeymoon एकदम स्पेशल असायला हवा असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. त्यामुळे अगदी लोकेशनपासून ते त्यासाठीच्या तयारीसाठी कपल्स खूप प्लानिंग करत असतात. लग्न बंधनात अडकल्यानंतर आयुष्यातील मोलाचे क्षण एन्जॉय करण्यासाठी जोडपी वेगवेगळ्या हनीमून डेस्टीनेशन्सना भेट देत असतात. पण आता फ्लाईटमध्येच हनीमूनसाठी सोय करण्यात आलीय.....अमेरिकेच्या Las Vegas मध्ये आता एक 'रॉयल' सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय. लव्ह क्लाउड जेट चार्टर नावाच्या कंपनीनं ही खास सुविधा सुरू केलीय. पण यासाठी खिसा खूपच रिकामी करावा लागणार आहे. हनीमून स्पेशल फ्लाइटचं बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ९९५ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७३ हजार रुपये खर्च करावे लागतील आणि तेही फक्त ४५ मिनिटांची राइडचा यात समावेश असणार आहे. आता या ४५ मिनिटात काय काय असणार आहेत हे पाहुयात...