Next

मुंबई पोलीस दलात पोस्टल बॅलेटद्वारे मतदानासाठी मोठी उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 19:13 IST2019-04-16T19:13:33+5:302019-04-16T19:13:47+5:30

मुंबई पोलीस दलातील १६ हजार पोलिसांनी यंदाच्या निवडणूकीत पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज दाखल

लोकसभा निवडणूकीमुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. यंदाच्या निवडणूकीत सहभागी होण्यासाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी ही मोठी उत्सुकता दाखवली आहे. मुंबई पोलीस दलातील १६ हजार पोलिसांनी यंदाच्या निवडणूकीत पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.