विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:12+5:302021-09-07T04:50:12+5:30

घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन वाशिम : स्थानिक नगर परिषदेकडून दैनंदिन शहरात घंटागाडी फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला ...

Work on power substations stalled | विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली

विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली

घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन

वाशिम : स्थानिक नगर परिषदेकडून दैनंदिन शहरात घंटागाडी फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जात आहे. नागरिकांनी इतरत्र फेकून न देता घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन नगर परिषदेने शनिवारी केले.

००००००

वाशिम शहरातील माहूरवेशीची दुरवस्था

वाशिम : शहरातील पुरातन माहूरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्याची मागणी हुकूम पाटील तुर्के यांनी केली.

०००००

पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित

वाशिम : जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांचा पदोन्नतीचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही. पात्र असलेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

Web Title: Work on power substations stalled