शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

आपण राहत असलेले शहर स्वच्छ व समस्यामुक्त असावे अशी प्रत्येक शहरवासीयाची इच्छा असते. त्यात खरे उतरण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य ...

आपण राहत असलेले शहर स्वच्छ व समस्यामुक्त असावे अशी प्रत्येक शहरवासीयाची इच्छा असते. त्यात खरे उतरण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थासंह तिथल्या लोकप्रतिनिधींवर असते. मग ती समस्या किरकोळ असो किंवा गंभीर. मात्र, ज्यावेळी एखाद्या किरकोळ समस्येकडे या दोन्ही घटकांकडून कानाडोळा केला जातो त्यावेळी ती समस्या शहराची डोकेदुखी बनते. शहरात पसरलेले अनधिकृत होर्डिंगही तशीच समस्या आहे. पुढाऱ्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग लावून त्यांची हाजी-हाजी करणे असो किंवा किरकोळ पद मिळाल्यावरही जग जिंकल्याच्या आनंदात लावले जाणारे शुभेच्छांचे होर्डिंग्ज असोत, शहरभरात उभारल्या जाणाऱ्या या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहरवासीयांमध्ये संतापाची तिडीक जाते. याबाबत प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाईवगळता कुठलीही कठोर कारवाई केली जात नसल्याने संतापात भर पडते.

---------------

२) या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?

वाशिम शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरांतील मुख्य चौक, रस्त्यांसह झाडांवर अनधिकृत होर्डिंग्ज लावले जात आहेत. वाशिम शहरातील पाटणी चौक परिसर, अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली रोड, बसस्थानक परिसरात काही होर्डिंग्ज अनधिकृतपणे लावले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार घडत असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही.

००००००००००००००००००००

३) सहा महिन्यांपासून कारवाई नाही

वाशिम नगरपालिकेने शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या होर्डिंग्जविरोधात जवळपास सहा महिन्यांपूर्वी कारवाईची मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत शहराच्या सर्वच मुख्य चौक, रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग्ज पालिकेच्या पथकाने हटवून ते जप्तही केले होते; परंतु गेल्या सहा महिन्यांत पुन्हा होर्डिंगचे प्रमाण वाढले असून, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

४) काय होऊ शकते कारवाई? (बॉक्स)

काय होऊ शकते कारवाई

अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाकडून कारवाई केली जाते. यात संबंधितांना सर्वप्रथम अनधिकृत होर्डिंज्ज काढण्याचे आदेश दिले जातात. त्यांनी काढले नाही, तर प्रशासन ती कारवाई करून येणारा खर्च व दंड वसूल संबंधिताकडून वसूल करते. एखादवेळी आवश्यकता भासल्यास गुन्हाही दाखल केला जातो. काही महिन्यांपूर्वी कोर्टाने अनधिकृत होर्डिंग्जविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची मुभा दिली आहे.

००००००००००००००००००००

५) अधिकारी काय म्हणतात?

कोट : शहरातील बहुतांश होर्डिंग्ज परवानगीने लावण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज आढळतात. त्यावर कारवाईसुद्धा कारवाई केली जाते. आता पुन्हा शहरातील सर्वच भागांत शोध मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग्ज हटविले जातील.

- दीपक मोरे,

मुख्याधिकारी, न.प., वाशिम