शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांकडून गणेश भक्तांचे स्वागत

By admin | Updated: September 16, 2016 03:03 IST

वाशिम शहरातील लाल मियॉ दर्गाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय, इतरांसमोर आदर्श.

वाशिम, दि. १५ - शहरात गुरुवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी लाल मियॉ दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांकडून विसर्जन मिरवणुकीमधील गणेश मंडळातील कार्यकर्ते व भक्तांचे स्वागत करून समाजासमोर आदर्श ठेवला. हिंदू धर्मियांच्या सण, उत्सवात मुस्लीम बांधव सहभागी होण्याची प्रथा अलिकडच्या काळात रुजत असल्याचे दिसते. तथापि, प्रत्यक्ष धार्मिक सण, उत्सवाच्या काळात मुस्लीम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र येण्याची उदाहरणे अगदी दुर्मिळ आहेत. असेच एक दुर्मिळ उदाहरण गुरुवारी वाशिम शहरात पाहायला मिळाले. १0 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या समाप्तीनिमित्त नित्याप्रमाणे बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. आता या मिरवणुकीत काही खोडकर व्यक्तींच्या चुकांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नव्हती. त्यातच मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला. शहरातील लाल मियॉ दग्र्याजवळ मुस्लीम बांधवांनी त्या ठिकाणी येणार्‍या पहिल्या अर्थात शिवशंकर गणेश मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव रंगभाळ यांचा नगर परिषद उपाध्यक्ष, तसेच लाल मियॉ दग्र्याचे हाजी मोहम्मद जावेद यांनी शाल व नारळ देऊन स्वागत केले. यावेळी ठाणेदार रवींद्र देशमुख, कादरभाई, रोशन ठेकेदार, रशिदभाई, इब्राहीम खतिब, मोहम्मद युसूफ, सुभानभाई, मोहम्मद मुसिफ, तौकिफ ठेकेदार यांच्यासह माधवराव अंभोरे, विसर्जन समितीचे नितिन पगार, नितिन उलेमाले, रवींद्र पेंढारकर, कपिल सारडा, जय ढवळे, सुनील तापडिया आदींसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती.