शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी जलसमाधीचा ईशारा

By admin | Updated: September 26, 2014 00:33 IST

शेतक-याचे तहसीलदारांना निवेदन.

तळप बु. : गारपीट व अतवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीला वर्ष उलटत आले तरी, तळप बु. परिसरातील शेतकर्‍यांना गारपीट व अतवृष्टीची मदत मिळाली नाही. शासनाकडून जाहीर झालेली मदत त्वरीत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेण्याचा ईशारा परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.रामतीर्थ, कार्ली, कारखेडा येथील काही शेतकर्‍यांना आजपर्यंत शासनाची मदत मिळाली नसल्याची तेथील शेतकर्‍यांची तक्रार आहे. मागील वर्षी झालेल्या गारपीट व अतवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. परंतु बर्‍याच शेतकर्‍यांनी ही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही. आपल्या खात्यात रक्कम जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी बँक , तहसील कार्यालय आणि तलाठी यांच्याकडे चकरा मारतोय. परंतु त्याचा उपयोग होत नाही. रामतीर्थ येथील शेतकरी सुधाकर मोतीराम गांवडे यांच्या नावावर २ हजार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर १0 हजार आर्थिक मदत तहसील दफ्तरी नोंद आहे. पण त्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा झाली नाही. त्वरित मदत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेवू असा ईशारा सुधाकर मोतीराम गावंडे, माणिकराव भगवंत गावंडे, विठ्ठल देवराव गांवडे आणि ब्रह्म परशराम रत्ने यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.