वाशिम मतदारसंघातील बंड कायम

By Admin | Updated: October 2, 2014 01:12 IST2014-10-02T01:12:30+5:302014-10-02T01:12:30+5:30

स्थानिक स्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेला बंडाचा भूंगा अद्यापही कायम.

Washim Constituency Constituted | वाशिम मतदारसंघातील बंड कायम

वाशिम मतदारसंघातील बंड कायम

वाशिम: भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी वाशिम मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीमधील बंड शमले असले तरी, कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेला बंडाचा भूंगा अद्यापही कायम आहे. कॉग्रेसच्या माजी जिल्हाउपाध्यक्षा डॉ. अल्का मकासरे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. डॉ. मकासरे यांना गत विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळीही आघाडीत झालेल्या बंडाळीमुळे त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येही बंडाची धग कायमच आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधणार्‍या महादेव ताटके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Washim Constituency Constituted