शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

वाशिम : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन राबविले जात असून, याअंतर्गत २२ ...

वाशिम : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन राबविले जात असून, याअंतर्गत २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान हाती घेण्यात आले आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे २२ जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. तालुका पातळीवर २८ ते ३१ जुलै आणि गावपातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृती आराखड्याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करून येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर हा आराखडा ठेवण्यात येणार आहे.

.........

सर्वांनाच मिळणार प्रशिक्षण

२२ जुलै रोजी जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर व जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार, यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गाव कृती आराखड्यातील माहिती संकलन, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणे बाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २३ ते २७ जुलै या कालावधीत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उप अभियंता, शाखा अभियंता, गटसमन्वयक, समूह समन्वयक यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

०००००००

कोट बॉक्स

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. या अंतर्गत २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. सर्व संबंधितांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.

- वसुमना पंत

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, वाशिम