शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला

By admin | Updated: September 12, 2014 23:04 IST

विधानसभेसाठी निवडणुक आचारसंहिता घोषीत; वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार.

वाशिम : जिल्हावासीयांच्या नजरा खिळून असलेल्या विधानसभा निवडणूकीचा बिगुल अखेर १२ सप्टेंबरला वाजला. निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी १५ स प्टेंबरला मुहूर्त ठरविला अन् अचानक पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात जिल्हाभरातील राजकारण तापायले सुरूवात झाली. छोट्या-मोठय़ा सर्वच राजकीय पक्ष्यांनी विधानसभा निवडणूकीच्या मोर्चेबांधणीची गती वाढविली असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडुन १५ ऑगस्ट नंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषीत होईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी, निवडणूक जाहीर झाली नाही. त्यानंतर गणेशोत्सवानंतरच आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल असे बोलल्या जात होते. अखेर अपेक्षेप्रमाणे १२ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा मुहूर्त घोषीत केला. विधानसभेची निवडणूक घोषीत होताच राजकीय पक्षांनी व इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली. जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. यापैकी वाशिम मतदार संघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षीत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये वाशिम व रिसोड मतदार संघ भाजपकडे तर एकमेव कारंजा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत रिसोड व वाशिम कॉग्रेसच्या वाट्यावर तर कारंजा राष्ट्रवादी कॉग्रेसकडे आहे. महायुती व आघाडीकडुन निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधून ठेवले आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रमच जाहीर झाला नसल्यामुळे कुण्याच पक्षाने अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. आता निवडणूक जाहीर झाली असुन लवकरच उमेदवार याद्या जाहीर होणार आहेत. त्यासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणीची गती वाढविली आहे.** १५ ऑक्टोबरला होणार विधानसभेसाठी मतदानसद्या पावसाळ्याचा मोसम आहे. त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यातील वातावरणही कमालीचे थंड आहे. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणूका जाहीर केल्यामुळे अचानक थंडीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरणात गरमी संचारली आहे.** १९ ऑक्टोबरला पार पडणार मतमोजणीराजकीय पक्षांनी इच्छूकांची चाचपणी यापूर्वीच पूर्ण केली आहे. मुलाखतीही घेतल्या आहेत. परंतु अद्याप एकाही पक्षाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळत असल्याचा दावा करीत आहेत.** उमेदवार्‍यांकडे खिळल्या जिल्हावासीयांच्या नजराराजकीय पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करीत नसल्याचे बोलले जात आहे उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी प्रत्येक पक्षाने त्यांच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लावल्याचे दिसून येत आहे.