अज्ञात चोरट्याकडून ट्रक लंपास

By Admin | Updated: September 21, 2015 00:07 IST2015-09-21T00:07:44+5:302015-09-21T00:07:44+5:30

पुसद नाका परिसरात उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लंपास केला.

Truck Traps from unknown thieves | अज्ञात चोरट्याकडून ट्रक लंपास

अज्ञात चोरट्याकडून ट्रक लंपास

वाशिम : पुसद नाका परिसरात उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली असुन या घटनेची १८ सप्टेंबर रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली. येथील निमजगा परिसरात वास्तव्यास असलेले जमी इस्माईल कुरेशी यांचा विट सप्लायरचा व्यवसाय आहे. विट सप्लाय करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रकवर (एम.एच.0४ सी.पी. ७५४५) फिरोज मुल्लाजी (रा. हिंगोली) हा मागील दोन महिण्यापासुन चालक म्हणुन काम करतो. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता फिरोज याने ट्रक नेहमीप्रमाणे पुसद नाका परिसरात असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये उभा केला. ट्रकचे कॅबीनला लॉक लावुन चाबी ट्रक मालक कुरेशी यांचकडे आणुन दिली. दोन दिवसानंतर अर्थातच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे फिरोजी याने कुरेशी यांचेकडून चाबी घेऊन गेला. परंतू, फिरोज यास ट्रक उभा केलेल्या ठिकाणी दिसुन आला नाही. ट्रकचा शहर व परिसरात शोध घेतला परंतू मिळून आला नाही. सदर ट्रकची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार एवढी आहे. कुरेशी यांनी या घटनेची वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक जाधव करीत आहेत.

Web Title: Truck Traps from unknown thieves