रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

By Admin | Updated: May 9, 2016 01:56 IST2016-05-09T01:56:51+5:302016-05-09T01:56:51+5:30

वनोजा व चिखली परिसरात अवकाळी पाऊस व वादळवारा.

Traffic jam due to tree falling on the road | रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

रिसोड: रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिखली, वनोजा परिसरात वादळवार्‍यासह तुरळक पाऊस झाला. वादळवार्‍याचा जोर जास्त असल्याने चिखली ते वनोजा या मार्गावर रस्त्यालगतचे झाड उन्मळून पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प होती.
रविवारी दुपारी २ वाजतानंतर वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वार्‍याला सुरुवात झाली. चिखली व वनोजा परिसरात लहान आकाराच्या गारांसह काही वेळ पाऊस झाला. वादळी वार्‍याचा जोर अधिक असल्याने वनोजा परिसरात काही झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. रिसोड ते वाशिम मार्गावरील चिखली-वनोजा या दरम्यानचे रस्त्यालगतचे बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एका तासानंतर जेसीबी वाहनाने झाड हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: Traffic jam due to tree falling on the road