शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर पोळ्याची परंपरा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषिप्रधान संस्कृतीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो; परंतु कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे बैलांऐवजी दरवर्षी ट्रॅक्टरचाच पोळा भरविला जातो.  ट्रॅक्टर हे शेतीतील अत्यंत उपयोगी यंत्र असल्याने कनेरगावात ट्रॅक्टरलाच बैल म्हणून कनेरगावात ...

ठळक मुद्देआगळा वेगळा पोळादरवर्षी कनेरगाव येथे भरविला जातो बैलांऐवजी ट्रॅक्टरचाच पोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषिप्रधान संस्कृतीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो; परंतु कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे बैलांऐवजी दरवर्षी ट्रॅक्टरचाच पोळा भरविला जातो.  ट्रॅक्टर हे शेतीतील अत्यंत उपयोगी यंत्र असल्याने कनेरगावात ट्रॅक्टरलाच बैल म्हणून कनेरगावात ट्रॅक्टरचा पोळा मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. शेतीत सध्या बैलजोड्या शेतकर्‍यांसाठी खर्चिक होत चालले असून, पशुधन जगवण्याएवढी ऐपत नसल्याने अलीकडच्या काळात शेतीत बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. कनेरगाव परिसरात शेतीसाठी मागील दोन दशकापासून ट्रॅक्टरचाच वापर केला जात आहे. या ट्रॅक्टरची पूजा करून गावात पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. ही परंपरा जोपासताना गावात बैलांप्रमाणेच ट्रॅॅक्टरची सजावट केली जाते. एका रांगेत ट्रॅक्टरला उभे करून ट्रॅक्टरची परंपरेनुसार मानकरी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा केली जाते. यावेळी पूजेनंतर ट्रॅक्टरची गावातून मिरवणूक काढली जाते. ट्रॅक्टरच्या चाकाखाली काकडी फोडून परंपरेप्रमाणे ट्रॅक्टरला नैवेद्यदेखील दाखवला जातो. गावात ट्रॅक्टरला बैलजोडी असेच संबोधले जाते. यंदाही थाटामाटात ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी जय्यत तयारीदेखील केलेली आहे. सोमवार, २१ रोजी याठिकाणी ट्रॅक्टरचा हा आधुनिक पोळा भरणार आहे. 

आगळा वेगळा पोळायांत्रिक युगात अलीकडच्या काळात आधुनिक बदल होऊन बैलांचा वापर कमी झाला असला, तरी कनेरगावात ही परंपरा १९ वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाली आहे. कै. शरद केशवराव जोशी यांच्या पुढाकारातून साकारली आहे. ती अद्यापही कायम आहे. कनेरगाव येथे भरविल्या जाणार्‍या पोळय़ात ५0 पेक्षा अधिक ट्रॅक्टर बैलांसारखे सजवून उभे केले जातात. बैलांप्रमाणेच त्यांची पूजाही केली जाते.