शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत तीन ठार

By admin | Updated: May 16, 2016 23:38 IST

भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला.

भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला.
या बाबतची माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान संतोष भगवान पवार (१८) व संगीता भगवान पवार (४६, रा़ वजीरखेडा ता. भोकरदन) हे दुचाकीने (एमएच २१ डब्ल्यू ६७९१) सिल्लोडकडे जात होते. दरम्यान सिल्लोडकडून भोकरदनकडे येणाऱ्या बस (एमएच २० डी ९८८१) ने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील संतोष पवार व त्याची आई संगीता भगवान पवार हे गंभीर जखमी झाले. याच वेळी भोकरदनकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या दुचाकीने (एमएच २१- २५७४) सुध्दा हुल दिल्याची माहिती समोर आली आहे़ यावेळी विजय चिंंचपुरे व इतरांनी जखमीना भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या शिलाताई फुके, माजी सभापती गणेश फुके, अशोक पवार, पंढरीनाथ पवार यांच्यासह अनेकांनी रूग्णालयात येऊन मृताच्या नातेवाईकाचे सांत्वन केले.
या प्रकरणात बसचालका विरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ दरम्यान, गत काही दिवसांपासून भोकरदन ते सिल्लोड हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)
भोकरदन : खराब रस्त्त्यामुळे घेतला बळी
भोकरदन ते पिंपळगाव रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. दानापूर ते सुरंगळी फाटा हा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर आता पर्यन्त पाच ते सहा अपघात झाले आहेत़ १६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान प्रकाश जाधव (४०) व पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) हे दोघे पती- पत्नी दुचाकीवर पिंपळगाव रेणुकाईकडे जात असताना पाण्याच्या पाटाजवळ या रस्त्याच्या कामावरील टिप्परने या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पंचफुलाई जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर दानापूर, भायडी येथील ग्रामस्थांनी संबंधित गुत्तेदारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. टिप्पर चालकाला अटक करण्यासाठी पंचफुलाबाई जाधव यांचा मृतदेह भोकरदन पोलिस ठाण्यात आणला होता. त्यानंतर टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.