शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात साडेतीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: October 2, 2015 02:15 IST

काण्णव प्लॉट परिसरातील घटना; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

कारंजा लाड (जि. वाशिम): शहरातील काण्णव प्लॉट परिसरातील एका कुलूपबंद घरात शिरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५१ हजार २00 रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास निदशर्नास आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक काण्णव प्लॉट येथील रहिवासी धरमचंद मोतीलाल जैन (५0) हे पत्नी उज्‍जवलासह २२ सप्टेंबर रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला व तीन खोल्यांमधील लाकडी कपाटातील ५0 हजार रूपये किमतीचे २0 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्न , दहा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजन असलेले कानातील सोन्याचे झुमके, एक लाख रुपये किमतीच्या चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, १ हजार २00 रुपये किमतीचा चांदीचा हळदी-कुंकवाचा करंडा, १५0 ग्रॅम वजनाचे ५७ हजार रुपये किमतीचे चांदीचे १५ शिक्के, ७६ हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे ताट, ५७ हजार रुपये किमतीचे चांदीचे पायदान असे मिळून ३ लाख ५१ हजार २00 रुपयांचे साहित्य लंपास केले. गुरुवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास जैन कुटुंबीय आपल्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी वाशिम येथील श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते; पण चोरीचा सुगावा लागला नाही. वाशिम येथील गुन्हे अन्वेषण विभागाने घरातील साहित्याला लागलेल्या चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी धरमचंद जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारंजा शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार त्यावरून लक्षात येते. चोरी झाली त्या ठिकाणी काही अंतरावर भारतीय स्टेट बॅक, कॅनडा बॅक, अँक्सिस बॅक तसेच कारंजा नागरी पतसंस्था तसेच एटीएम आहे. या महत्त्वाच्या परिसरात धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा होती. या चोर्‍यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.