चोरट्यांनी सिनेस्टाईल पळविली सोन्याची साखळी

By Admin | Updated: December 25, 2014 02:02 IST2014-12-25T02:02:46+5:302014-12-25T02:02:46+5:30

वाशिम शहरात भर दिवसा भर चौकात चोरट्याचा प्रताप.

The thieves threw a silhouette of a gold chain | चोरट्यांनी सिनेस्टाईल पळविली सोन्याची साखळी

चोरट्यांनी सिनेस्टाईल पळविली सोन्याची साखळी

वाशिम : लग्न समारंभ आटोपून घरी परतणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ डिसेंबरला दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास मन्नासिंह चौकात घडली.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील शुक्रवार पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या शीतल किशोर झुंझारे ही महिला आपल्या कुटुंबासोबत स्वागत लॉनमधील लग्न समारंभाला गेली होती. लग्न आटोपून घरी परत जात असताना मन्नासिंह चौकात भरधाव मोटारसायकलवर दोन युवक आले. त्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली. यामध्ये अर्धी साखळी जमिनीवर तुटुन पडली, तर अर्धी साखळी घेऊन दोन्ही युवक घटनास्थळावरून लंपास झाले. सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकारामुळे शहरवासीयांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल हिवरकर करीत आहेत.




 

Web Title: The thieves threw a silhouette of a gold chain