सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:03+5:302021-02-05T09:27:03+5:30

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी ...

There will be no student in CBSE X this year | सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार

सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी खराेखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. या निर्णयाबाबत पालकांची मते जाणून घेतली असता त्यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५०७ विद्यार्थी आहेत. काेराेनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत पालकांशी चर्चा केली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत.

.................

काय आहे नवीन नियम

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास की नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त पाच विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्यांचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पास म्हणजे दहावीत पास अशी व्यवस्था असेल. तसेच दहावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी पर्यायी विषय म्हणून कौशल्य विकास अभ्यासक्रम असेल. यामुळे विद्यार्थी यांचा फायदा असल्याचे हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, वाशिम प्राचार्य सिद्धार्थ चाैबे यांनी सांगितले.

.....................

पालकांच्या प्रतिक्रिया

सीबीएसई बाेर्डाने दहावीच्या परीक्षेत काेणीही विद्यार्थी नापास हाेणार नसल्याचे ऐकले आहे. असे असेल तर हा निर्णय चांगला आहे.

- माया गजानन टाले

काेराेनामुळे विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने सर्वच विद्यार्थी पासचा निर्णय उत्तम आहे.

- शिवाजी रामराव देशमुख,

पालक, कारंजा

आता दहावीत नापास होण्याची चिंता विसरा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय जाहीर केला असल्याचे ऐकले आहे. या निर्णयामुळे काेणत्याच विद्यार्थ्याचे नुकसान हाेणार नाही.

- सुमेघ श्रीपद तायडे, पालक, मालेगाव

Web Title: There will be no student in CBSE X this year