नागरिकांमध्ये दहशत; दुचाकी नव्हे, तर चोरट्यांनी चोरलं केवळ गाडीचं चाक
By सुनील काकडे | Updated: September 10, 2022 17:23 IST2022-09-10T17:22:32+5:302022-09-10T17:23:21+5:30
रिसोडातील प्रकार : नागरिकांमध्ये दहशत

नागरिकांमध्ये दहशत; दुचाकी नव्हे, तर चोरट्यांनी चोरलं केवळ गाडीचं चाक
सुनील काकडे
वाशिम - घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाचे समोरचे चाक अज्ञात चोरट्याने लंपास केले. रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत १० सप्टेंबरच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रिसोडच्या महानंदा कॉलनीत शिक्षक अनिल हरिभाऊ पाचोरे हे भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. ९ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी एम.एच. ३७ पी ९८४२ या क्रमांकाची त्यांची दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले असता दुचाकी वाहन घरापासून काही अंतरावर समोरचे चाक नसलेल्या अवस्थेत आढळून आले. पाचोरे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.