शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिक्षक कार्य गौरव सप्ताह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

वाशिम : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून शिक्षण विभागातर्फे शिक्षक कार्य गौरव सप्ताह ...

वाशिम : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून शिक्षण विभागातर्फे शिक्षक कार्य गौरव सप्ताह (थँक ए टीचर) राबविण्यात येत आहे. ७ सप्टेंबरपर्यंत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो तसेच विद्यार्थीदेखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षकदिनी व्यक्त करीत असतात. सद्यस्थितीत कोविड- १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू करता आलेल्या नाहीत. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने तसेच दुर्गम भागात अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून शिक्षणाचे धडे दिले. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि. २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘थँक ए टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह राबविला जात आहे. जिल्ह्यातही विविध उपक्रमातून शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

...

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, कार्यक्रम

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने आयोजन करणे, या माध्यमातून शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.

००००००

कोट बॉक्स

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविण्यात येत आहे. या माध्यमातून उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.

-रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी, वाशिम