शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी, समायोजनाची प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:20 IST

अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी व समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने याचा फटका राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. वेतनही नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत

वाशिम : अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी व समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने याचा फटका राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. वेतनही नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.राज्यातील शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य शासनाने अपंग समावेशीत शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मध्यंतरी शासनाने अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. यावर शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने उच्च न्यायालयाच्या २००९ च्या निर्णयाने अपंग समावेशीत शिक्षकांना सुद्धा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती अधिनियम १९८१ लागू असल्यामुळे या शिक्षकांच्या सेवा समाप्त करता येत नाहीत असे आदेश दिले होते. या आदेशानुसार अशा शिक्षकांना पुनर्स्थापित करण्यात आले. या शिक्षकांना सेवासातत्य, वेतनश्रेणी लागू करून समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटना तसेच संस्थाचालकांकडून वारंवार करण्यात आली. परंतू, याबाबत शासनस्तरावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. बरीच वर्षे सेवा होऊनही तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्थी अधिनियम १९८१ लागू असूनही त्यांना सेवासातत्य व वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी २१ जानेवारी रोजी केली.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक