शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील ऊस कृषी विभागाच्या कागदावरून गायब

By admin | Updated: December 16, 2014 00:09 IST

मालेगाव तालुक्यात १५0 हेक्टरवर ऊस : कृषी विभागाच्या लेखी केवळ एका हेक्टरवर ऊस, पिकांच्या नोंदीत घोळ.

संतोष वानखडे/वाशिमशेतातील पिकांचा ह्यलेखाजोखाह्ण ठेवणारा कृषी विभाग प्रत्यक्ष पीकनिहाय क्षेत्रफळाची नोंद कशी करतो, याचे कारनामे समोर येत आहेत. गत काही वर्षांपासून मालेगाव तालुक्यात ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्रफळात वाढ होत असतानाही, कृषी विभागाच्या लेखी मालेगाव तालुक्यात केवळ एक हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या कागदाने शेतातील ऊसच गायब केल्याने, बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.शेतकर्‍यांनी शेतात काय-काय पेरले, याची नोंद घेण्याची जबाबदारी गावपातळीवरील कृषी कर्मचार्‍यांवर निश्‍चित करण्यात आलेली आहे. कृषी कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि नंतर तेथून सदर नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे रवाना केली जाते. गत पाच-सहा वर्षांपासून शेतातील प्रत्यक्ष पिकांच्या नोंदीमध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी ह्यघोळह्ण करून ठेवला असल्याचेही कारनामे समोर येत आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची नोंद कागदावर घेतली जात नसल्याची बाब कृषी विभागाच्या आकडेवारीने अधोरेखीत केली आहे. मालेगाव तालुक्यात जवळपास १00 हेक्टरच्या वर ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्र आहे; मात्र कृषी विभागाच्या लेखी २0१२-१३ आणि २0१३-१४ मध्ये केवळ एका हेक्टरवर तर २0१४-१५ मध्ये ऊसाची लागवडच झाली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृषी विभागाने जणू गायब केला आहे.*सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हशेतकर्‍यांनी शेतात कशाची पेरणी किंवा लागवड केली, याची माहिती कृषी कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र मालेगाव तालुका ऊसविरहित नोंदविल्याने सर्वेक्षण झाले कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. शहरी भागात किंवा अन्यत्र बसून पीक पेरणीच्या नोंदी घेतल्या जात असल्याची बाब कृषीच्या आकडेवारीने समोर आणली.