शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींची गटार तुडवत शाळेतून ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

मानोरा शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सततच्या पावसामुळे मोठ्या ...

मानोरा शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. मानोरा नगरपंचायतने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले असून, काही रस्त्यांचे काम करून मजबुतीकरण करण्यात आले, तर काही अंतरातील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. प्रामुख्याने राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयास जोडणारा रस्ताच कच्चा आहे. आता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू असून, या रस्त्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थिनींची ये-जा सुरू आहे. त्यात सततच्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात शाळेत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नसल्याने विद्यार्थिनींना याच रस्त्यावरून चिखलात पाय रुतवत आणि स्वत:ला सावरत ये-जा करावी लागते. या प्रकारात अपघाताची भीती तसेच आरोग्यालाही धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

०००००००

घसरून पडल्याने विद्यार्थिनी जखमी

दिग्रस रोडवरील रणजित जाधव यांच्या घरापासून पुढे इंदिरा गांधी कन्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने या चिखलातून स्वत:ला सावरत विद्यार्थिनींना वाट काढावी लागते. या प्रयत्नातच एक विद्यार्थिनी शनिवारी या ठिकाणी घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटनाही घडली. यामुळे पालकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

००००००००००००००००००००००००

कोट : विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता सततच्या पावसामुळे चिखलमय होत आहे. या चिखलातून वाट काढताना एक विद्यार्थिनी शनिवारी पडल्याने तिचे डोके फुटले. या घटनेनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. आता त्वरित रस्त्याचे काम केले नाही, तर विद्यार्थिनी, पालकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल.- प्रा. संकेत रोठे,

इंदरा गांधी कन्या विद्यालय, मानोरा