उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:22+5:302021-09-04T04:49:22+5:30

उत्पन्न दाखल्याकरिता सेतू सुविधा केन्द्रावर अर्ज करावा लागतो. तेथून ऑनलाईन दाखले तयार केले जातात. त्यावर नायब तहसीलदार राठोड यांची ...

Students, parents suffer due to non-receipt of income certificates | उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

उत्पन्न दाखल्याकरिता सेतू सुविधा केन्द्रावर अर्ज करावा लागतो. तेथून ऑनलाईन दाखले तयार केले जातात. त्यावर नायब तहसीलदार राठोड यांची डिजिटल सही केली जाते. त्याकरिता थंब लावावा लागतो. मात्र सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अड़चण असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे दाखले मिळत नाहीत. लवकर तांत्रिक अडचण दुरुस्ती करून दाखले उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे.

सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याने दाखले मिळण्यास अड़चणीचे जात आहे, लवकरच दुरुस्ती होऊन दाखले मिळतील.

- एम. जे. राठोड,

नायब तहसीलदार, मानोरा.

१० वी, १२ वीचा निकाल लागला आहे. मुलांना विविध शैक्षणिक कामाकरिता तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. गेल्या आठ दिवसांपासून पालक तहसील कार्यालय, सेतू केंद्रामध्ये चकरा मारत आहेत. संबंधितांनी तात्काळ याविषयी कार्यवाही करावी.

- गोपाल भोयर

पंचायत समिती सदस्य, मानाेरा

Web Title: Students, parents suffer due to non-receipt of income certificates