शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:43 IST

प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या बसगाड्यांची मार्गावरील इत्तंभूत माहिती प्रवाशांना मिळावी म्हणून ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ विकसीत केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या अनेकदा विलंबाने धावतात. नियोजित बसस्थानकावर बस केव्हा पोहोचेल, हे प्रवाशांना माहित नसते. तसेच बसमध्ये बिघाड झाला असल्यास किती वेळ लागेल आणि नेमकी बस कोठे आहे, याची माहिती परिवहन महामंडळालाही मिळत नाही. यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाने ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ विकसीत केले आहे. यामुळे प्रवासी, तसेच एसटीच्या संबंधित आगारांना त्यांच्या सर्व बसगाड्यांची मार्गावरील स्थिती कळू शकणार आहे. त्यातच प्रवाशांनाही ही माहिती मिळणार असल्याने बससाठी बसस्थानकावर किंवा थांब्यावर तासनतास ताटकळत बसावे लागणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाºया बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, लवकरच इतर सर्व विभागाच्या बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सदर अ‍ॅप हे जीपीएस यंत्रणेवर आधारित आहे. या अ‍ॅपद्वारे आपल्या जवळपासची बसस्थानके, तेथे येणाºया-जाणाºया बसगाड्यांचे क्रमांक, मार्ग आणि आणि लोकेशन इत्यादी माहितीही मिळणार आहे. हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’वर उपलब्ध करण्यात आले असून, स्मार्ट फोनधारकांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करता येणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी