शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या उत्पादनात होणार मोठी घट!

By admin | Updated: September 13, 2016 02:58 IST

नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी.

सुनील काकडे वाशिम, दि. १२: निसर्गाचा लहरीपणा, पावसातील प्रदीर्घ खंड आणि महावितरणची अवकृपा अद्याप कायम असल्याने जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीनची नुकसान पातळी ५0 टक्क्याच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात यंदाही मोठी घट होईल, अशी भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात यंदा ४ लाख १ हजार ५४७ हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात तूर ६0 हजार १४७ हेक्टर, मूग १२ हजार ६00 हेक्टर, उडीद १५ हजार २१७ हेक्टर, ज्वारी ५ हजार २९१ हेक्टर, कपाशी १८ हजार ७३0 हेक्टर यासह इतर किरकोळ स्वरूपातील पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक क्षेत्रावर अर्थात २ लाख ८८ हजार ६३२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनने मात्र गत तीन वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांना मोठा दगा दिला आहे. ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने मारलेल्या दीर्घ दडीमुळे सध्या या पिकाची दयनीय अवस्था झाली असून, शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. अहोरात्र काबाडकष्ट करूनही डोळ्यादेखत सोयाबीनची राखरांगोळी होत असल्याचा अनुभव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना येत आहे. कृषी विभागाने ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन सोयाबीनची पाहणी करावी आणि झालेली नुकसानभरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.