शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

झनकांच्या ज्ञानदानाचा झरा विद्यार्थ्यांसाठीच वाहे अखंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

वाशिम : गेल्या १४ वर्षांपासून कार्य करताना वर्षातील ३६५ दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविश्रांत कार्य करणारे ...

वाशिम : गेल्या १४ वर्षांपासून कार्य करताना वर्षातील ३६५ दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविश्रांत कार्य करणारे शिक्षक म्हणून विनोद झनक यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या ज्ञानदानाचा झरा विद्यार्थ्यांसाठीच अखंड वाहत असून नावीन्यपूर्ण शिक्षणातून शेकडो विद्यार्थी घडत आहेत. शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

सध्या साखरा (ता. वाशिम) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या विनोद झनक यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकावे, या उद्देशातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्याची अपेक्षित फलश्रुती देखील झाली. त्यांनी घडविलेले ३७ विद्यार्थी नवोदयमध्ये शिक्षण घेत आहेत. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत २७ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत आहे. एनएमएमएस या प्रतिष्ठेच्या परीक्षेत २५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्या सर्वांना १२ हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे चार वर्षे ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत आहे.

.................

उत्कृष्ट ज्ञानदानाच्या कार्याचा गाैरव

शिक्षक विनोद झनक त्यांच्या कार्याला न्याय देत गेले आणि त्यातूनच शाळेच्या नावलाैकिकासह विद्यार्थीही घडत गेले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना आदर्श शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित केले. शिक्षक सहकारी पतसंस्थेने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार बहाल केला. मराठा सेवा संघ व वाशिम पं.स.नेही कोरोना योद्धा पुरस्कार देऊन झनकांना सन्मानित केले.

................

शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग

शिक्षक विनोद झनक यांनी ज्ञानदानासोबतच नावीन्यपूर्ण प्रयोगही केले. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे विविध संदर्भ साहित्य, वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तके, शालेय पातळीवर सराव म्हणून परीक्षांचे आयोजन, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, कार्यशाळा, विविध प्रशिक्षण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना सतत प्रोत्साहित केले.

.................

चौकटीबाहेर जाऊन कार्य करणारे शिक्षक

चौकटीबाहेर जाऊन कार्य करण्याची जिद्द व योग्य नियोजन असेल तर तुम्हाला यशापासून कुणीही दूर ठेवू शकत नाही, असे शिक्षक विनोद झनक यांचे म्हणणे आहे. त्यांनी स्वत: हे सूत्र अमलात आणले. वर्षातील ३६५ दिवस रजा न घेता त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. तंत्रज्ञानाचा वापर करत शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांनी कमी होऊ दिली नाही.