शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:55 IST

कोण्यातरी कार्यकर्त्यांने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायल केल्याने याबाबत चविष्टपाणे चर्चा रंगताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रीय मनुष्यबळ विकास दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी शनिवारी मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी ते शिरपूर येथे पाहणी करण्याकरिता गेले असता भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालून प्रश्नांचा भडीमार केला. भाजपा नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत पंजाचे काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्यात. आपला सिम्बॉल काय पंजा की कमळ असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी मालेगाव तालुक्यातील शिरपूर, वसारी, पांगरी कुटे आदी गावांना नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी बाधीत शेतकऱ्यांनी धोत्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपबिती कथन केली. ते शिरपूर येथे गेले असता त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.शिरपूरमध्ये पोहचल्याबरोबर काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी धोत्रे यांना कार्यकर्ते म्हणाले की, साहेब विधानसभा निवडणुक मतदानाच्या काही दिवसापूर्वी याच मतदारसंघातील भाजपाचे नेते, माजी आमदार यांनी कार्यकर्त्यांना ‘पंजा’चे काम करण्याच्या सूचना दिल्यात. आम्ही रात्रंदिवस ज्या पक्षाच्या विरोधात उभे आहोत त्याच पक्षाचे काम आम्हाला करावयास सांगणे कितपत योग्य आहे. साहेब तुम्ही एकदा क्लिअर करा की आपला सिम्बॉल पंजा आहे की कमळ. यावेळी मात्र धोत्रे यांना काय बोलावे सुचेनासे झाल्याने त्यांनी चुकीचे आहे एवढे म्हणून विषय बाजुला सारला. परंतु कोण्यातरी कार्यकर्त्यांने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायल केल्याने याबाबत चविष्टपाणे चर्चा रंगताना दिसून येत आहेत.

केंद्रीय मंत्री महोदयांसोबत मी दौºयावर असताना हा प्रकार घडला. परंतु ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत ते तर भाजपाचे कार्यकर्तेच नव्हते. दुसरी बाब म्हणजे कोणी तरी त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला असावा. माझ्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता ते भाजपाचे कार्यकर्ते नसल्याने त्यांनी माफी सुध्दा मागितली. विशेष म्हणजे मी भाजपाचा निष्ठावान असल्याने दुसºया पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे सांगणार कशाला . नागरिक सुज्ञ आहेत त्यांना हेसांगण्याची गरज नाही.

-विजयराव जाधव, माजी आमदार

 

टॅग्स :washimवाशिमBJPभाजपाcongressकाँग्रेसSanjay Dhotreसंजय धोत्रेPoliticsराजकारण