जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST2021-04-16T04:41:15+5:302021-04-16T04:41:15+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी ...

Simply celebrate Babasaheb Ambedkar Jayanti in the district | जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे नागेश थोरात, उमेश बोरकर, रवींद्र सोनोने, सु. ब. जाधव, रामानंद ढंगारे, मुकुंद नायक, सचिन गटलेवार, राम श्रृंगारे, सुनील मारुतकर, सतीश लहामगे, वारकर आदिंसह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्यात आला तसेच उपस्थितांनी आपापसात भौतिक अंतर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.

Web Title: Simply celebrate Babasaheb Ambedkar Jayanti in the district