शिरपूर येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:02 IST2021-02-23T05:02:18+5:302021-02-23T05:02:18+5:30

दरवर्षी साजरा होणारा श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव यंदा ता. २३ ते २६ दरम्यान साजरा होणार होता. मात्र कोरोनाचा वाढता ...

Shri Vishwakarma Jayanti Festival at Shirpur canceled | शिरपूर येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव रद्द

शिरपूर येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव रद्द

दरवर्षी साजरा होणारा श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव यंदा ता. २३ ते २६ दरम्यान साजरा होणार होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व गर्दी टाळण्याचे शासनाचे आदेश असल्याने येथील श्री विश्वकर्मा संस्थानमध्ये होणारा जयंती महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे, तर तिन्ही दिवसाचे धार्मिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात येतील. जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी भगवंताचे सहपरिवार घरीच पूजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे, तर २५ रोजी उत्सवाच्या दिनी साध्या पद्धतीने अभिषेक व पूजन करीत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होईल. कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता शासन-प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत हा महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे.

Web Title: Shri Vishwakarma Jayanti Festival at Shirpur canceled