शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी दिवसात खरेदीचे होणार ‘सीमोल्लंघन’

By admin | Updated: October 3, 2014 00:41 IST

कोरड्या दुष्काळाच्या सावटातही वाशिम येथील बाजारपेठ फुलली, खरेदीसाठी लगबग.

वाशिम : साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मानल्या जाणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर वाशिमसह जिल्हावाशी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दसर्‍याचा मुहुर्त साधत सोने खरेदी करण्याला ग्राहक पसंती देत आहेत. मात्र, कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे सराफा बाजाराला दसर्‍याच्या मुहूर्ताच्या दिवशी मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.यंदाच्या दसर्‍यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दसर्‍याच्या पूर्वसंध्येला शोरूममध्ये समाधानकारक बुकिंग झाली नव्हती. मुहूर्तावर गाडी घरी नेण्याचे नियोजन अगोदरच करून ठेवण्यात आल्याने काही खरेदीदारांनी गाडी अगोदरच बुक करून ठेवली आहे. यामुळे विक्रेत्यांना दसर्‍याच्या मुहूर्तावर गाडी देणे सोपे होणार आहे. दिवस मावळला तरीही चालेल पण मुहूर्तावर गाडी घरी न्यायचीच असा अनेकांचा अट्टाहास असल्यामुळे विक्रेतेही या दिवशी विशेष काळजी घेत असतात. उद्याही सर्वच शोरूम मध्ये काही काऊंटर वाढविण्यात येतील, अशी शक्यता आहे. यावर्षी दुचाकी वाहनांची खरेदी गतवर्षीसारखीच राहिल असा अंदाज वर्तविण्याबरोबरच खरिपाचा हंगाम निराशाजनक जात असल्याने ट्रॅक्टरच्या खरेदीत निरुत्साह असल्याचे शोरूम संचालकांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केले. दसर्‍याच्या पूर्वसंध्येपर्यंत चारचाकी वाहनांची बाजारपेठ फारशी तेजीत नव्हती. दसर्‍याच्या प्रत्यक्ष दिवशी कदाचित बाजारपेठ तेजीत येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. दुचाकी वाहनांची बाजारपेठ मात्र तेजीत राहिल, असा विश्‍वासही शहरातील विविध शोरुमच्या संचालकांनी व्यक्त केला. इलेक्ट्रानिक्स वस्तु, मोबाईल व सोने खरेदीची अशीच परिस्थिती राहणार आहे. काही लोकांनी आजच सोन्याची खरेदी केल्यामुळे कदाचित सराफा बाजारात राहणारी गर्दी कमी राहणार असली तरी इलेक्टॉनिक्स वस्तुच्या खरेदीसाठी गर्दी मात्र राहणार आहे. डिस्काऊंटच्या ऑफर असल्याने साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची बाजारपेठ तेजीत राहील.