शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारच्या राजवटीत घोटाळय़ांची मालिकाच!

By admin | Updated: October 13, 2014 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील जाहीर सभेत अमित शहा यांची टीका.

कारंजा लाड (वाशिम): राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने १५ वर्षांच्या राजवटीत घोटाळय़ांशिवाय काहीच केले नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली. महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रचारसभा रविवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यात आजवर ३५ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आघाडी सरकारने मात्र सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा असे विविध घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. काँग्रेसने शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले; परंतु पॅकेजचे पैसे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेच नाही. सुजलाम, सुफलाम महाराष्ट्र आघाडी सरकारने कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न करून, भाजपशासित राज्यांमध्ये चांगला विकास झाल्याचा दावा शहा यांनी केला.नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपने सर्वप्रथम देशाला बोलणारा पंतप्रधान दिला. त्यांच्या वकृत्व शैलीने सं पूर्ण जग भारावले, असे शहा यांनी सांगितले. गत ६0 वर्षांत देशातील ५0 टक्के नागरिकांचे बँकेत खातेच उघडले नाही. भाजपने जनधन योजना जाहीर केली आणि या योजनेंतर्गत देशातील पाच कोटी नागरिकांनी बँकेत खाते उघडले. त्यामुळे १ लाखांचे विमा संरक्षण त्यांना मिळाले. देशाचा विकास दर ८.४ टक्के असताना काँग्रेस सरकार सत्तेवर आले. १0 वर्षांच्या काळात हा दर ४.२ टक् क्यांपर्यंत घसरला. भाजपने हा दर तीन महिन्यातच ५.७ टक्क्यांवर नेला, असे शहा यांनी सांगितले. सीमेवर पाकिस्तानकडून होणार्‍या गोळीबाराबाबत काँग्रेसकडून केल्या जाणार्‍या आरोपांचा शहा यांनी समाचार घेतला. पूर्वी पाकिस्तानी सैनिक गोळीबार सुरू करायचे आणि थांबवायचेही तेच. आ ता चित्र बदलले आहे. गोळीबार आताही सुरू त्यांच्याकडूनच होतो; परंतु तो थांबवतात भारतीय सैनिक, असा टोला त्यांनी लगावला. मोदींनी मेक इन इंडिया हा मंत्र देऊन, विदेशी कंपन्यांना बाजारपेठ मोकळी करून दिली; परंतु या देशात उत्पादने विकायची असतील, तर ती येथेच तयार करावी, असे आवाहन केल्यानंतर देशात ३ हजार कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखविली. पंतप्रधानांनी बेटी बचाव, स्वच्छ ता अभियान, आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केल्याचे स्पष्ट करून, मोदी सरकारने चार महिन्यात काय केले, हे सांगण्यासाठी भागवत सप्ताह आयोजित केला तरी, ते सांगता येणार नाही, असेही शहा म्हणाले.