शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST

तालात थिरकले गणेशभक्त: दुसर्‍या टप्प्यात मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे विसर्जन.

मंगरूळपीर : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ९ सप्टेंबर रोजी येथील येथील भक्तांनी बाप्पांना जड अंतकरणाने निरोप दिला. तत्पूर्वी, शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी जल्लोष करीत गणेशाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेतले.येथील संत बिरबलनाथ महाराज गणेश मंडळाच्या मूर्तीची आरती व पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. यावर्षी पोलीसांनी जय महाराष्ट्र, भारत, संकल्प, आदर्श, रामदेवबाबा, वीर भगतसिंग, साई यासह इतर काही सार्वज़निक गणेश मंडळांना मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी धम्माल केली. चौकाचौकात गुलालाची उधळण झाली. डीजेच्या तालावर भाविकांनी फेर धरीत बाप्पांचा जयजयकार केल्याने अवघे शहर दणाणले होते. काही गणेश मंडळाने पारंपरिक वाद्य वाजवून तर काहींनी आधुनिक डीजेवर गाणे वाजवून गणेशाला चोख पोलिसबंदोबस्तामध्ये निरोप दिला. मानोरावासीयांनीही दिला निरोप मानोरा : शहरात २९ ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवाचा ९ सप्टेंबरच्या रात्री समारोप झाला. त्यानिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीत भाविकांनी ढोल ताशांचा गजर करून गणेशाला निरोप दिला. यावर्षी शहरात १0 गणेश मंडळाने सार्वजनिक मूर्तीची स्थापना केली होती. मिरवणुकीत भाविकांनी डीजे तालावर नृत्य केले. गणेशभक्तांनी एकमेकांवर गुलालाची उधळण करून गणपतीबाप्पांचा जयजयकार केला. शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीसांनी चोच बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुक सुरू होती. मालेगाव : मागील १0 दिवसांपासून मालेगाव शहरात बाप्पांच्या आगमनामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले होते. ९ सप्टेंबर रोजी भक्तीमय वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या चा निरोप देवून बाप्पांची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.शहरात गणपती विसर्जनाची मिरवणुक सकाळी ९ वाजता पासून सुरु झाली. शहरातील मोठा मारोती, गांधी चौक येथून मिरवणुक मार्गस्थ झाली. ट्रॅक्टरवर सजवलेल्या गणपती मंडळांच्या मुर्त्या आकर्षक सजवण्यात आल्या होत्या. ढोलताश्याच्या निनादात, गुलालांची उधळण करत, म्युझीक बॅन्ड पार्टीच्या सहवासात बाप्पांची मिरवणुक उत्साहात निघाली होती. काही भाविकांनी केळी येथील धरणात तर काहींनी काटेपूर्णा, चाकातिर्थ येथे गणेश विसर्जन केले.