शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय व्यवस्थापन समिती निवडणुकीला राजकीय रंग!

By admin | Updated: September 6, 2016 01:55 IST

वाशिम जिल्हा परिषद शाळांमधील व्यवस्थापन समिती निवडणुका; शिक्षणावर विपरित परिणाम.

अमोल कल्याणकर मालेगाव (जि. वाशिम), दि. ५: जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी गावातील विविध पक्षांच्या गटांमध्ये मोठी राजकीय खेळी सुरू झाली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती निवडणुकीला गावोगावी राजकीय रंग चढत असल्याचे दिसून येत आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद गावपातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते, तेव्हा-तेव्हा चक्क पोलीस बंदोबस्तात मतदान घ्यावे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीला वेगळे वलय मिळाल्याने तद्वतच राजकीय हस्तक्षेप वाढल्याने त्याचा विपरित परिणाम शाळांमधील शिक्षणावर होत आहे. गावात अध्यक्षपदाचा मान आणि शालेय व्यवस्थापन समितीला मिळालेल्या आर्थिक अधिकारांमुळे यात मोठय़ा प्रमाणात राजकीय पक्षांची घुसखोरी झाली आहे. प्रत्येक गावात विविध राजकीय पक्षांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गट असतात, आपल्याच गटाला, पक्षातील पालक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष व्हावा, यासाठी अनेकदा मोठी चुरस निर्माण होते. पालकसभेत कुणाच्याही नावावर एकमत होत नसल्याने शेवटी गुप्त मतदान होऊन पालक प्रत्येक वर्गातून सदस्यांची निवड करतात. यासाठी एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच तयारी केली जाते.आपल्याच पक्षातील अथवा गटातील पालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडावी, यासाठी डावपेचही खेळले जात आहेत. यामुळे शिक्षण देणारी शाळा जणू राजकीय आखाडा होत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.