शाळा समितीनेच ठोकले शाळेला कुलूप !

By Admin | Updated: September 30, 2015 01:29 IST2015-09-30T01:29:16+5:302015-09-30T01:29:16+5:30

वाकद येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेला कुलूप ठोकून व्यक्त केला रोष.

School committee locked school locked! | शाळा समितीनेच ठोकले शाळेला कुलूप !

शाळा समितीनेच ठोकले शाळेला कुलूप !

वाकद (जि. वाशिम ): येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत दोन शिक्षकांची पदे रिक्त असल्याने व वारंवार सूचना देऊनही त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेला २८ सप्टेंबर रोजी सकाळी १0.३0 वाजता कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. येथील जिल्हा परिषद शाळेत मागील दोन वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ३५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कायद्यानुसार एका शिक्षकांकडे ३0 विद्यार्थी असावेत; परंतु येथील शिक्षकांकडे ५0 ते ६0 विद्यार्थी आहेत. सध्या केवळ आठ शिक्षक कार्यरत असून, त्यापैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मापारी यांनी सर्व सदस्यांच्या सहय़ानिशी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती यांच्याकडे निवेदने दिली; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे संपप्त होऊन अखेर शाळेला कुलूप ठोकले. परिणामी शाळा बाहेर भरविण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मालनताई शिवलाल बिजोरे, सावित्री अवताडे पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मापारी, उपाध्यक्ष श्रीराम साठे, शिक्षणतज्ज्ञ शे. मुकेश शे. इलू, सदस्य शारदा ज्ञानेश्‍वर बोरकर, अनूसया भास्कर कष्टे, नाजियाबी शे. असलम, पालक गुलाबखाँ पठाण, रघुनाथ जटाळे, उद्धवराव जटाळे, राजू खोलगाडगे, संतोष चोपडे, विजय देशमुख, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अयूबभाई तसेच सर्व सदस्य व गावकरी यावेळी उपस्थित होते.

Web Title: School committee locked school locked!