पंचाळा ते पोहरादेवी रस्ता नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:21+5:302021-09-08T04:50:21+5:30

मानोरा तालुक्यात नादुरुस्त असलेले अनेक गावातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी विद्यमान आमदारांनी शासनाकडून भरीव निधी मंजूर करून घेतला; मात्र आजही ...

The road from Panchala to Pohardevi is bad | पंचाळा ते पोहरादेवी रस्ता नादुरुस्त

पंचाळा ते पोहरादेवी रस्ता नादुरुस्त

मानोरा तालुक्यात नादुरुस्त असलेले अनेक गावातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी विद्यमान आमदारांनी शासनाकडून भरीव निधी मंजूर करून घेतला; मात्र आजही तालुक्यातील असंख्य गावे, पाडे, तांडे येथे ये-जा करण्यासाठी असलेले रस्ते खड्ड्यांनी भरल्याचे निदर्शनास येत आहे. या रस्त्यांवरील नदी, नाले, ओढ्यांवर असलेले पूल नादुरुस्त व कमी उंचीचे असल्याने वाहून जाण्याची अथवा त्याठिकाणी अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील रस्ते आणि पुलांवर खर्च करीत असताना निकृष्ट दर्जाच्या व जीवघेण्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणारे कंत्राटदार बांधकाम झाल्यानंतर पैशाची उचल करून मोकळे होतात आणि रस्ते, पूल निर्मिती झाल्यानंतर पुढील काही वर्षातच रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी मागणीही यानिमित्ताने जोर धरत आहे.

Web Title: The road from Panchala to Pohardevi is bad