जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST2021-02-07T04:37:31+5:302021-02-07T04:37:31+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांची भेट नाकारण्यात आलेली आहे. दरम्यान, वाशिम येथील कारागृहात ...

Relatives of 150 inmates of the district jail have not been seen for 10 months | जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही

जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांची भेट नाकारण्यात आलेली आहे. दरम्यान, वाशिम येथील कारागृहात बंदिस्त असलेले १५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. कारागृह प्रशासनाने त्यांना मोबाईल व व्हिडीओ कॉलची सुविधा मात्र उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने विविध घटकांवर परिणाम केला आहे. मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढायला लागला. यावेळी खबरदारी म्हणून शासनाने सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यासोबतच जिल्हा कारागृहातील कैद्यांना संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध आणले.

......................

जिल्हा कारागृहातील आकडेवारी अशी

कारागृह क्षमता

२००

कैदी संख्या

१५०

......................

कधी मोबाईल फोन; तर कधी व्हिडीओ कॉल

जिल्हा कारागृह प्रशासनाने नातेवाईकांसोबत बोलण्याकरिता कैद्यांना मोबाईल फोन किंवा व्हिडीओ कॉल करण्यास परवानगी दिलेली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही, अशी स्थिती आहे.

...............

बॉक्स :

जैन संस्थानने दिले कैद्यांना स्वेटर

जैनांची काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानकडून जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना २०० ब्लँकेट देण्यात आली आहेत. याशिवाय जुने ब्लँकेटही उपलब्ध असल्याने थंडीच्या दिवसात कैद्यांची सोय झाली आहे.

...................

कोट :

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून शासनाने जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध घातले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही; मात्र त्यांना मोबाईल फोन व व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- सोमनाथ पाडुळे

जिल्हा कारागृह अधीक्षक, वाशिम

Web Title: Relatives of 150 inmates of the district jail have not been seen for 10 months