शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘हाय रिस्क’ कोरोनाबाधित गर्भवती ‘रेफर टू अकोला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 11:54 IST

Washim News : उपचाराची कुठलीच सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेस ‘रेफर टू अकोला’ केले जात आहे. 

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या तथा ‘हाय रिस्क’ असलेल्या महिलांची प्रसूती करण्याची तसेच जन्माला आलेले बाळही पाॅझिटिव्ह असल्यास त्याच्यावर उपचाराची कुठलीच सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेस ‘रेफर टू अकोला’ केले जात आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसूतीकरिता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांनाही प्रसूतीपूर्वी किमान ‘रॅपिड ॲंटिजन टेस्ट’ करून घेण्याचे बंधन घालण्यात येत आहे. त्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास किंतू-परंतु न ठेवता संबंधित महिलेची प्रसूती केली जाते. मात्र, अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या तथा ‘हाय रिस्क’ असल्यास शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये अशा महिलांच्या प्रसूतीची तथा नवजात बाळ कोरोनाबाधित असल्यास त्याच्यावर उपचाराची कुठलीच सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या नातेवाईकांची पुरती तारांबळ उडत आहे. तथापि, किमान जिल्हा मुख्यालयी वाशिम येथे ‘हाय रिस्क’ कोरोनाबाधित गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.

वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्च महिन्यात २३६ ; तर एप्रिल महिन्यात २०९ महिलांची प्रसूती झाली. या सर्व महिलांची त्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेण्यात आली. त्यातील ५ ते ६ महिला ‘हाय रिस्क’ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. संबंधितांना खबरदारी म्हणून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता रेफर करण्यात आले. साैम्य लक्षणे असणाऱ्या महिलांची मात्र जिल्हा रुग्णालयातच प्रसूती केली जात आहे- डाॅ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकीत्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या