राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी रिसोडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:17 IST2021-02-06T05:17:39+5:302021-02-06T05:17:39+5:30

येथील पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता आयोजित संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, ...

Rakan State President Jayant Patil at Risod on Saturday | राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी रिसोडमध्ये

राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी रिसोडमध्ये

येथील पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता आयोजित संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा व पक्ष विस्तार करणे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती प्रदेश अध्यक्ष सुक्षणा सलगर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांच्यासह सर्व नेते मंडळी बाबाराव पाटील खडसे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शनिवारला आयोजित केलेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, तालुका अध्यक्ष तेजराव वानखडे यांनी केले आहे. (वा.प्र.)

Web Title: Rakan State President Jayant Patil at Risod on Saturday