शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सरासरी १०३ टक्के, ३५ प्रकल्प निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही ...

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही जलसाठा झाला नाही, केवळ ४९ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सिंचनासह पाणीटंचाईची समस्या काही भागांत उद्भवण्याची भिती आहे.

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला नाही, परंतु मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले होते. जून महिन्यात पावसाची अपेक्षित अशी नोंद झाली नाही, तर जुलै महिन्यात पावसाने दीर्घकाळ खंड दिला. त्यामुळे पेरण्या उलटण्याची आणि कोरडा दुष्काळाची भीतीही वाटू लागली होती. तथापि, जुलैच्या मध्यंतरापासून आणि ऑगस्ट महिन्यातही पूर्वार्धात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने धडाका लावल्याने पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तथापि, पावसाळा संपण्यास आता अवघे २३ दिवस उरले असतानाच जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

०००००००००००००

तिन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर

जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ७६ टक्के जलसाठा झाला आहे, तर जिल्ह्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाल्याने मालेगाव तालुक्यातील सोनल आणि वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत.

०००००००००००००

वाशिम तालुक्यात पाऊस व जलसाठा सर्वात कमी

जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांत सरासरी ७८ टक्के जलसाठा झाला असला तरी वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असल्याने या तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत केवळ ४५ टक्केही जलसाठा झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येण्याची शक्यता आहे.

०००००००००००००

गत २४ तासांत ४७.७० मि.मी. पाऊस

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण सरासरी ९७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता होतीच. त्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपासून ते ७ सप्टेंबर सकाळपर्यंतच्या २५ तासांत जिल्ह्यात ४७.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०३ टक्क्यांवर पोहोचली.

००००००००००००००००००

-जिल्ह्यातील एकूण प्रकल्प - १३७

-एकूण जलसाठा - ७७.८७ टक्के

- मध्यम प्रकल्पातील जलसाठा - १००

- लघू प्रकल्पातील जलसाठा - ६५.४३

००००००००००००००००००००००००००००००००

० ते ५० टक्क्यांपर्यंत साठा असलेले तालुकानिहाय प्रकल्प

तालुका - प्रकल्प

वाशिम - २२

मालेगाव - ०१

कारंजा - ०२

मंगरुळपीर - ०१

रिसोड - ०७

मानोरा - ०१

--------------------