आर. जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये ‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:47+5:302021-09-08T04:49:47+5:30

‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळेमध्ये शिक्षक पवार यांनी विद्यार्थ्यांना श्री गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. बाजारपेठेमध्ये वाढती किंमत बघता आपण ...

R. J. ‘Eco Friendly Ganesha’ Workshop at Chavre High School and Convent | आर. जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये ‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळा

आर. जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये ‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळा

‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळेमध्ये शिक्षक पवार यांनी विद्यार्थ्यांना श्री गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. बाजारपेठेमध्ये वाढती किंमत बघता आपण अतिशय कमी खर्चामध्ये घरीच कशाप्रकारे श्री मूर्ती बनवू शकतो हे पटवून दिले. श्री मूर्ती बनविल्यानंतर पर्यावरणपूरक रंग कशाप्रकारे वापरून रंगरंगोटी करता येईल याबद्दल सूचित केले.

आपण घरीच बनविलेल्या किंवा मातीच्या श्री मूर्तींचीच आगामी गणेश उत्सवांमध्ये आपल्या घरी स्थापना करावी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन समस्त नागरिकांना व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालक मंडळातर्फे व विद्यालयातर्फे करण्यात आले.

कार्यशाळेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

येथील आर. जे. चवरे हायस्कूल, व कॉन्व्हेंटमध्ये ७ सप्टेंबर रोजी युट्यूबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन ‘इको फ्रेंडली गणेशा’ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शाळेतील तब्बल ३०० विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या सर्वांना कलाशिक्षक पवार यांनी प्रात्यक्षिकाद्वारे गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

Web Title: R. J. ‘Eco Friendly Ganesha’ Workshop at Chavre High School and Convent