शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

उंबर्डा बाजार --- ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेली ग्रामीण भागातील सार्वजनिक ...

उंबर्डा बाजार --- ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेली ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारामुळे शोभेची वास्तू झाली आहेत.

ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने शासनाच्यावतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली. मात्र, अनेक गावांमध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलकसुद्धा नसल्याने वाचकांत गावात वाचनालय आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अनेक वाचनालयांत नियमित वर्तमान पत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन, चार वर्तमानपत्रांची महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमानपत्रांतून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित राहावे लागत आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमानपत्र वाचनापासून वंचित राहावे लागत आहे.