मनोरुग्णाचा पत्नीसह इतर चौघांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST2021-02-20T05:56:59+5:302021-02-20T05:56:59+5:30

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५ वाजता बालाजी मापारी (वय ४० वर्षे) यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांनी चक्क हातात विळा ...

The psychiatrist attacked four others, including his wife | मनोरुग्णाचा पत्नीसह इतर चौघांवर हल्ला

मनोरुग्णाचा पत्नीसह इतर चौघांवर हल्ला

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५ वाजता बालाजी मापारी (वय ४० वर्षे) यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांनी चक्क हातात विळा घेऊन पत्नी कांचन मापारी यांना मारहाण केली. त्यात कांचन जखमी झाल्या. त्यानंतर, गावातीलच राजरत्न कांबळे हा शेतातून घरी परत येत असताना त्याला बालाजीने मारहाण केली. यासह पांडुरंग मापारी यास शेतात जाऊन मारहाण केली. संतोष मापारी आणि रमेश मापारी या दोघांनाही बालाजी मापारीने मारहाण करून जखमी केले. गावचे पोलीस पाटील विश्वनाथ मापारी यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी गावात येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व बालाजी मापारीला ताब्यात घेऊन त्याची नागपूर येथील मानसिक रुग्णालयाकडे रवानगी केली.

.......................

बॉक्स :

गावात दहशत अन् पोलिसांनाही मारहाण

मानसिक संतुलन बिघडलेल्या बालाजी मापारी यांनी बोरी बु. येथे १८ जानेवारी रोजी अक्षरश: धुमाकूळ घातला. मिळेल त्याला मारहाण करण्याच्या प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गावकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, यावेळी बालाजी मापारी यांनी पोलीस पथकातील दोघांनाही मारहाण केली. या प्रकाराची गाव परिसरात जोरदार चर्चा होती.

Web Title: The psychiatrist attacked four others, including his wife