शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव; शनिवारी होणार बैठक

By admin | Updated: August 31, 2016 02:18 IST

वाशिम जिल्हा परिषदेला दुर्धर आजारग्रस्तांचे ५७ प्रस्ताव; लोकमत वृत्ताची दखल

वाशिम, दि. ३0: जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार्‍या १५ हजार रुपयांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील ५७ दुर्धर आजारग्रस्त लाभार्थींचे प्रस्ताव बैठकीअभावी रखडल्याचे वृत्त 'लोकमत'ने २५ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी बैठक लावण्याचे निर्देश दिल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषधोपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त अशा ५७ रुग्णांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केले. दर तीन महिन्यांनी होणार्‍या सभेत या प्रस्तावांना मंजुरात मिळणे अपेक्षीत आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यात जिल्हाभरातून ५७ प्रस्ताव आरोग्य विभागाला प्राप्त झाले. मात्र, जूनच्या अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आणि त्यानंतर ८ जुलै रोजी विषय समिती सभापतींची निवडणूक झाली. विषय समिती सभापतींच्या निवडणुकीनंतर खाते वाटप झाल्याने, जुलै महिन्यात होणारी आरोग्य समितीची बैठक लांबणीवर पडली. परिणामी, दुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव ह्यजैसे थेह्णच आहेत. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने २५ ऑगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना बैठक लावण्याचे निर्देश दिले. बैठकीची तारीख निश्‍चित करून त्यामध्ये सर्व पात्र व अपात्र प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याचे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.