शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार तोफा अजूनही बारूदीविनाच!

By admin | Updated: October 3, 2014 00:35 IST

अद्याप वाशिमसह कारंजालाड येथील निवडणुक प्रचारसभा प्रभावहीन.

दिवाकर इंगोले /कारंजा(वाशिम)विधानसभा निवडणूक पंधरा दिवसांवर आली तरी, कोणत्याही पक्षाने आपल्या निवडणूक तोफात पुरेशी बारूद भरलीच नाही. त्यामुळे प्रचारयात्रा फार प्रभावी झाली नाही. तथापि, उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्रचार दौरे मात्र सुरू झाले. अद्याप चिन्ह वितरित झाले नाही. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडी तुटल्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आजपर्यंत परस्परांच्या सहकार्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत; परंतु त्यांची अद्यापही तशी मानसिकता तयार व्हायची आहे.युतीतील मित्रपक्ष आता शत्रू पक्ष म्हणून परस्पराशी स्पर्धा करणारा व आपल्या पक्षाला सरस ठरविणारा निर्णायक प्रचार अद्याप सुरू झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांची आघाडी बिघाडी झाल्यामुळे उमेदवाराचा मिळून प्रचार करणारे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहे. पूर्वी मित्र असलेल्यांना आपल्याच मित्राच्या विरुद्ध गरळ ओकावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या कारंजा मतदारसंघात बहुरंगी लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे. ही संपूर्ण लढाई अगदी लक्षवेधी ठरणार आहे. महाभारतासारखे आपल्याच नातेवाइकांशी प्रचारयुद्ध पुकारायचे आहे. ग्रामीण भागात प्रचार सभेशिवाय अद्याप कारंजा शहरात गर्दीला अर्थ देणारी कोणतीही भव्य प्रचार सभा झाली नाही. यावर्षी ही निवडणूक बहुरंगी ठरणार आहे. थोड्याफार फरकाने उमेदवाराचा विजय होईल. कारंजा श्हराची हवा अद्याप कोणत्याही उमेदवाराला हात देण्याएवढी स्थिती दर्शविणारी नाही. सध्या सर्वच आघाड्यांवर सामसूम आहे.